नलगे तुझें मज नामावीण कां...

 

नलगे तुझें मज नामावीण कांहीं । देसी तरी पाही हेंचि एक ॥१॥

तुह्मां देतां घडे आम्हा घेतां योग्य । उभयतां भाग्य पडिपाडें ॥२॥

देतां होय धर्म घेतां होय पुण्य । करितांही न्यून नव्हे कांहीं ॥३॥

ऐसिया व्यापारा पूर्वपुण्यलाभ । साह्य पद्मनाभ होय तेव्हां ॥४॥

तुका ह्मणे देवा देसी तरी आहे । जन्मोजन्मीं पाये न सोडीं मी ॥५॥

comments powered by Disqus