समग्र संत तुकाराम
न्यानोबाने रचिला पाया, तुका झालासे कळस ... अश्या शब्दांनी संत तुकारामांचे वर्णन मराठी समाजाने केले आहे. सर्वसाधारण घरांत जन्मात आलेल्या तुकाराम महाराजांनी भक्ती रसाने ओतप्रोत असे अंभंग लिहिले. संत तुकाराम ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मार्गदर्शन केले होते असे जाणकारांचे मत आहे. निःसंशय पणे संपूर्ण हिंदू धर्मातील संत मंडळींची आठवण करायची झाल्यास तुकाराम महाराज सर्वप्रथम असतील.