असो सर्व आतां तुमचिया माथ...

 

असो सर्व आतां तुमचिया माथां । आम्ही करुं चिंता कासयासी ॥१॥

लाभ अलाभ हे संकल्प विकल्प । वासनेचें पाप किती म्हणे ॥२॥

शुद्धाशुद्ध खरें खोटें वाहे मन । विलास हा मान धन गोड ॥३॥

भावाभाव भक्ति अभक्ति चित्ताची । रुचि कुश्चळची जोडी केली ॥४॥

तुका म्हणे ऐसें तुम्हासीच कळे । भार हा समूळ तुम्हा हातीं ॥५॥

comments powered by Disqus