मळीण झाली काया । बहुत माझ...

 

मळीण झाली काया । बहुत माझी देवराया ॥१॥

तुझें उजळिलें नाम । चित्त प्रक्षाळिलें प्रेम ॥२॥

अनुतापीं झाला झाडा । प्रारब्धें केला तोडा ॥३॥

तुका म्हणे देह पायीं । ठेऊनि झालों उतराई ॥४॥

comments powered by Disqus