जाणता नेणता नाहीं पांडुरं...

 

जाणता नेणता नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें ॥१॥

तुज ठावें होतें पातकी मी खरा । आधींच कां थारा दिल्हा पायीं ॥२॥

अंक तो पडिला हरीचा मी दास । भेद पंगतीस करुं नये ॥३॥

तुका म्हणे आजी जिंतिलें तें खरें । जातां उणें पुरें तुम्हालागीं ॥४॥

comments powered by Disqus