काय निवडावें कोण तो निवाड...

 

काय निवडावें कोण तो निवाड । केलें माझ्या कोड वचनाचें ॥१॥

अहो कृपानिधि गुणाच्या निधाना । माझ्या अनुमाना नयेचि हें ॥२॥

बहुत करुन केलेंसे भाषण । एकहि वचन नाहीं आलें ॥३॥

माझी कांहीं सेवा होईल पावली । निश्चिति मानिली होती ऐसी ॥४॥

तुका म्हणे माझी उरली ते आटी । अभयकर कटीं न देखेंचि ॥५॥

comments powered by Disqus