भक्तीची अपेक्षा धरुनी अंत...

 

भक्तीची अपेक्षा धरुनी अंतरीं । राहे भीमातीरीं पंढरीये ॥१॥

अठ्ठावीस युगें गेलीं विचरतां । निर्गम सर्वथा नव्हे देख ॥२॥

कटीं कर उभा शिणलें शरीर । धरुनि निर्धार भक्तिभावें ॥३॥

तुका म्हणे आतां नको खटपट । आमुचे बोभाट पाहों नको ॥४॥

comments powered by Disqus