वेडें वाचाहीन मुकें । माझ...

 

वेडें वाचाहीन मुकें । माझ्या बोलविसी मुखें ॥१॥

तुझी सत्ता वाहें शिरीं । तेणें बोलली वैखरी ॥२॥

करुं जे जे सेवा । आम्ही करविली देवा ॥३॥

केलों निमित्त्यासी । तुका म्हणे बोलायासी ॥४॥

comments powered by Disqus