अनुभवावांचुनी । काय सांगस...

 

अनुभवावांचुनी । काय सांगसी काहणी ॥१॥

नाहीं ठावा पंढरिराव । हें तों अवघेंचि वाव ॥२॥

तेथें मानी तुझें कोण । कोरडें तें ब्रह्मज्ञान ॥३॥

तुका म्हणे ठेवा । जाणपणें एकी सेवा ॥४॥

comments powered by Disqus