पाय ऐसियाचे धरा । जेणें र...

 

पाय ऐसियाचे धरा । जेणें राम येइल घरा ॥१॥

किती सांगावें तुम्हासी । जा रे जा रे संतांपाशीं ॥२॥

संत कृपेनें तत्काळ । दासां भेटतो गोपाळ ॥३॥

तुका म्हणे संतसेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा ॥४॥

comments powered by Disqus