वृंदावन फळ घोळिलें शर्करा...

 

वृंदावन फळ घोळिलें शर्करा । भितरील थारा न मोडेचि ॥१॥

तैसे दुर्जनाचे न जाती दुर्गुण । स्वभाव कठीण म्हणोनियां ॥२॥

पाषाण न विरे भिजतां सागरीं । काग गंगातीरीं न्हाती काय ॥३॥

तुका म्हणे केली कारळ्याची खीर । घालितां साखर कडू वाटे ॥४॥

comments powered by Disqus