न लगे जीव देणें सहज जाणार...

 

न लगे जीव देणें सहज जाणार । आहे तों विचार करा कांहीं ॥१॥

मरण मागतो गाढवाचा बाळ । बोलतो चांडाळ शुद्ध याती ॥२॥

तुका म्हणे कईं होइल याचें हित । निधानही थित सांडिताती ॥३॥

comments powered by Disqus