नामाचे पवाडे ऐकती श्रवण ।...

 

नामाचे पवाडे ऐकती श्रवण । अर्थीं तें मनन वेधियेलें ॥१॥

चित्ता होय सुख वेधीं लागे हेत । वासना शांत ठायीं ठायीं ॥२॥

जीवा बोध झाला निर्वाळला आत्मा । उठावला प्रेमा आवडाचा ॥३॥

उपरति चित्ता झाली तृप्तीवरी । रोमांच शरीरीं दाटलासे ॥४॥

तुका म्हणे अंगीं आदळे अवस्था । यया नांव वक्ता श्रवणार्थी ॥५॥

comments powered by Disqus