सांगतों या लोकां रांडा पु...

 

सांगतों या लोकां रांडा पुजूं नका । वकुंठनायका भजा वेगीं ॥१॥

काय असे चंडी शक्तिचिय हातीं । अधःपाता नेती अंतकाळीं ॥२॥

म्हणोनियां भाव धाव पांडुरंगी । भवसिंधु वेगीं पार पावी ॥३॥

तुका म्हणे ज्याच्या नामे हे पतित । पावले त्वरित वैकुंठासी ॥४॥

comments powered by Disqus