फुगडी घालितां उघडी राहें ...

 

फुगडी घालितां उघडी राहें । लाज गे सांडूनी येकायेकीं पाहें ॥१॥

फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे । संसार तोडीं गे ॥२॥

मागें जें शिकली होतिस पोटीं । तेंच विचारुनी आतां उच्चारीं ओंठीं ॥३॥

त्रिगुणाची वेणी तुझे उडे ते पाठीं । आवरुनीं धरीं घालीं मूळबंदीं गांठी ॥४॥

आगळें पाऊल जिंके एकाएक । पावसील मान हे मानवती लोक ॥५॥

तुका म्हणे तुजमज मध्यें एक भाव । समतुकें बार घेऊं पावों उंच ठाव ॥६॥

comments powered by Disqus