माचे गाण माझा जवळील ठाव ।...

 

माचे गाण माझा जवळील ठाव । निरोपीन भाव होईल तो ॥१॥

तुम्हा निद्रा मज आज्ञा ते स्वभावें । उतरुनी जीवें जाइन लोण ॥२॥

येकायेकीं बहु करीन सुस्वरें । मधुरें उत्तरें आवडीचीं ॥३॥

तुका म्हणे तूं जगदानी उदार । फेडिसील भार येका वेळे ॥४॥

comments powered by Disqus