हें आम्हा सकळ । तुझ्या ना...

 

हें आम्हा सकळ । तुझ्या नामाचेंचि बळ ॥१॥

करुं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥२॥

जयाचा जो भोग । सुख दुःख पीडी रोग ॥३॥

तुका ह्मणे देवा । तुझे पायीं मज हेवा ॥४॥

comments powered by Disqus