अहो उभें या विठेवरी । भरो...

 

अहो उभें या विठेवरी । भरोवरी चुकविली ॥१॥

निवारलें जाणें येणें । कोणा कोणें रुसावें ॥२॥

संकल्पासी वेंचे बळ । भारें फळ निर्माण ॥३॥

तुका म्हणे उभयतां । भेटी सत्ता लोभाची ॥४॥

comments powered by Disqus