पाहें पांडुरंगा मज तुझी आ...

 

पाहें पांडुरंगा मज तुझी आस । आणिकाची कास काय धरुं ॥१॥

घालोनियां उडी यावें बा तांतडी । माय पैलथडी तारावया ॥२॥

माझा करुणाशब्द पडो तुझे कानीं । मज बा निर्वाणीं कोण आहे ॥३॥

तुका म्हणे रात्रंदिवस कटे खंती । नये तुमचे चितीं कृपा कांहीं ॥४॥

comments powered by Disqus