कैसें म्या पहावें एकतत्व ...

 

कैसें म्या पहावें एकतत्व झालों । राखणें लागलों वासनेसी ॥१॥

तुम्हांवीण कांहीं नावडती जीवा । केला तोचि देवा पण सत्य ॥२॥

वर्म नेणों परि वृत्ति भंगों नेदी । वंदिलेंचि वंदीं आवडीनें ॥३॥

तुका म्हणे कळे नामाचें जीवन । वारता हे भिन्न नेणों आतां ॥४॥

comments powered by Disqus