सत्यसंकल्पाचा दाता

 

सत्यसंकल्पाचा दाता नारायण ।
सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥

येथें अलंकार शोभती सकळ ।
भावबळें फळ इच्छेचेंतें ॥२॥

अंतरींचें बीज जाणे कळवळा ।
व्यापक सकळां ब्रह्मांडाचा ॥३॥

तुका ह्मणे नाहीं चालत तांतडी ।
प्राप्‍तकाळघडी आल्याविण ॥४॥

comments powered by Disqus