ॐकार प्रधान रूप

 

ॐकार प्रधान रूप गणेशाचे ।
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥१॥

अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णु ।
मकार महेश जाणियेला ॥२॥

ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्‍न ।
तो हा गजानन मायबाप ॥३॥

तुका ह्मणे ऐसी आहे वेदवाणी ।
पहावी पुराणे व्यासाचिया ॥४॥

comments powered by Disqus