बैसलों निश्चळ नेणें कांही...

 

बैसलों निश्चळ नेणें कांहीं कळा । ध्यानीं कळवळा आवडीचा ॥१॥

गातां नये ताल स्वर ना मधुर । परी निरंतर हेंची करु ॥२॥

देहाची ममता त्यागियली चिंता । नाहीं लज्जा आतां वाटों देत ॥३॥

तुका ह्मणे अंगें होउनी निःशंक । देंउनियां हाक गात असें ॥४॥

comments powered by Disqus