गाऊं नाचूं हरिरंगीं । शक्...

 

गाऊं नाचूं हरिरंगीं । शक्ति अद्भुत हे अंगीं ॥१॥

होतों देणें तुमचें देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥२॥

वसूं न शके पाप । पळे त्रिविध ताप ॥३॥

तुका म्हणे वाणी । नाम अमृताची खाणी ॥४॥

comments powered by Disqus