स्नानविधि तुम्हासाठीं देव...

 

स्नानविधि तुम्हासाठीं देवधर्म । क्रिया नित्यनेम तुम्हासाठीं ॥१॥

तुजलागीं दान तुजलागीं तीर्थ । सकळही व्रतें तुजलागीं ॥२॥

सर्व चित्तवृत्ति दिन आणि राती । आवडसी प्रीती नारायणा ॥३॥

तुका म्हणे यावें पवित्रांच्या राया । प्राणविसांविया पांडुरंगा ॥४॥

comments powered by Disqus