गांवींच्या प्रभूनें बोलाउ...

 

गांवींच्या प्रभूनें बोलाउनी वरी । हजामत बरी केली माझी ॥१॥

माझ्या मायबापें नव्हतें केलें कोड । गाढवाचें घोडें देवें दिलें ॥२॥

कंदर्पाच्या माळा घालुनियां गळां ॥ ऐसा हा सोहळा नव्हता झाला ॥३॥

सोईरे धाईरे आणिक सहोदर । धरियलें छत्र मजवरी ॥४॥

मायबापें दोन्ही आणिक करवली । वरात मिरवली ऐसी नव्हती ॥५॥

तुका म्हणे तुम्ही हळुहळू चाला । उगाच गलबला करुं नका ॥६॥

comments powered by Disqus