ठिरीचें मांदळ नासिकाचें च...

 

ठिरीचें मांदळ नासिकाचें चंग । नाचती सुरंग नाना छंदें ॥१॥

दगडाचे टाळ दुसर्‍या चिपुळ्या । वाजविती टाळ्या दोहों हातीं ॥२॥

मुखीं गाती गाणें हरि राम कृष्ण । प्रेमें नारायण तया अंगीं ॥३॥

नाहीं भय धाक कळिकाळ त्यांसी । आपआपणासी विसरले ॥४॥

तुका म्हणे भावा भुललासे देव । अधिकचि हांव चढे दुणी ॥५॥

comments powered by Disqus