देव एक देव एक । निष्कलंक ...

 

देव एक देव एक । निष्कलंक विश्वात्मा ॥१॥

देव कांहीं देव कांहीं । कोठें नाहीं हें नव्हे ॥२॥

देव पावे देव पावे । भक्ता धांवे स्मरतां ॥३॥

देव मुका देव मुका । सवें तुका बोलतो ॥४॥

comments powered by Disqus