आणिक उपाय नेणेचि मी कांही...

 

आणिक उपाय नेणेचि मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे ऐसें ॥१॥

नये धड कांहीं बोलता वचन । रिघालों शरण सर्व भावें ॥२॥

कृपा करिसी तरी थोडें तुज काम । माझा तरी श्रम बहु हरे ॥३॥

तुका म्हणे मज दाखवीं श्रीमुख । हरे तान भूक डोळियांची ॥४॥

comments powered by Disqus