अमृत तें प्रेम जिव्हा ओला...

 

अमृत तें प्रेम जिव्हा ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥१॥

सकळहि तेथें वोळलीं मंगळें । वृष्टि केली जळें आनंदाच्या ॥२॥

सकळ इंद्रियें झालीं ब्रह्मरुप । ओतलें स्वरुप तयामाजी ॥३॥

तुका म्हणे जेथें वसे भक्तराव । तेथें नांदे देव नारायण ॥४॥

comments powered by Disqus