उच्छिष्ट तीं फळें खाय भिल...

 

उच्छिष्ट तीं फळें खाय भिल्ल्टीचीं। आवडी तयांची मोठी देवा ॥१॥

काय देवा घरीं न मिळेचि अन्न । मागे भाजीपान द्रौपदीचें ॥२॥

अर्जुनाचीं घोडीं धुतलीं अनंतें । संकटें बहुत निवारिलीं ॥३॥

तुका म्हणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळावे हें ॥४॥

comments powered by Disqus