कोणें युगीं कोणे काळीं । ...

 

कोणें युगीं कोणे काळीं । जैसा तैसा वनमाळी ॥१॥

नाहीं अधिक उणीव । पूर्णपणें स्वयमेव ॥२॥

कार्यालागीं अवतार । धरी माझा रमावर ॥३॥

तुका म्हणे भक्तांलागीं । अवतरे युगायुगीं ॥४॥

comments powered by Disqus