भूक तान्ह कैसी राहिली ...

 

भूक तान्ह कैसी राहिली निश्चळ । खुंटलें चपळ मन ठायीं ॥१॥

द्रव्य जीवाहूनि आवडे या जना । आम्हासी पाषाणाहूनि हीन ॥२॥

सोईरे सज्जन जन आणि वन । अवघे समान काय गुणें ॥३॥

तुका म्हणे आम्हा जवळीच आहे । सुखदुःख साहे पांडुरंग ॥४॥

comments powered by Disqus