जरी व्हावा तुज देव । तरि ...

 

जरी व्हावा तुज देव । तरि हा सुलभ उपाव ॥१॥

करीं मस्तक ठेंगणा । लागें संताच्या चरणा ॥२॥

आणिकांचे कानीं । गुणदोष मना नाणीं ॥३॥

तुका म्हणे फार । थोडा करीं उपकार ॥४॥

comments powered by Disqus