जेणें निर्मियेली काया । क...

 

जेणें निर्मियेली काया । कां रे नाठविसी तया ॥१॥

अंतीं यमाची जाचणी । सोडवाया नाहीं कोणी ॥२॥

गृहधन सुतदारा । कां रे भुललासी गव्हारा ॥३॥

तुका म्हणे पाहीं । धरा विठ्ठल हृदयीं ॥४॥

comments powered by Disqus