अवघा भार घालीं देवा । नलग...

 

अवघा भार घालीं देवा । नलगे देश डोई घ्यावा ॥१॥

देह प्रारब्धा आधीन । केला तो तो होतो शीण ॥२॥

व्यवसाय निमित्त । परी फळे हें संचित ॥३॥

तुका म्हणे फेरे फिरे । भोवंडीनें दंभ जिरे ॥४॥

comments powered by Disqus