जन देव तरि पायांचि पडावें...

 

जन देव तरि पायांचि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥१॥

अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोन नेतां नये ॥२॥

तुका म्हणे विंचू सर्प नारायण । वंदावे दुरुन शिवों नये ॥३॥

comments powered by Disqus