स्वरुपाचे ठायीं चित्त तें...

 

स्वरुपाचे ठायीं चित्त तें बैसेना । जाणावें वासना गेली नाहीं ॥१॥

काया वाचा चित्त जडे भगवंतीं । तेव्हां होय शांति वासनेची ॥२॥

तुका म्हणे रामनामाचा हो घोष । तेणें वासनेस क्षय होय ॥३॥

comments powered by Disqus