नव्हे सांगितलें शिकविलें ...

 

नव्हे सांगितलें शिकविलें ज्ञान । अंगींचा हा गुण सहजचि ॥१॥

राहतां न राहे दिल्हें हेंचि सांडी । मागिलाची जोडी त्यागी सर्व ॥२॥

निःशंक निर्भय स्फुरण सर्वांगीं । उदासीन जगीं देहभाव ॥३॥

गृह सुत वित्त कुळ श्रेष्ठ गोत । मागील वृत्तांत नाठवेचि ॥४॥

तुका म्हणे वेष शूरत्वाचे अंगीं । सतीचे विभागीं एक भाव ॥५॥

comments powered by Disqus