विरोधाचें मज न साहे वचन ।...

 

विरोधाचें मज न साहे वचन । बहु होतें मन कासा वीस ॥१॥

म्हणवुनी जीवा न साहे संगती । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥२॥

देहाची भावना वासनेचा संग । नावडे उबग आला यांचा ॥३॥

तुका म्हणे देव अंतरे यामुळें । आशा मोह जाळें दुःख वाटे ॥४॥

comments powered by Disqus