अवघाचि देव वेगळें तें काय...

 

अवघाचि देव वेगळें तें काय । अर्थासाठीं डोय फोडूं पाहे ॥१॥

अवघाचि दंभ घातलें दुकान । चाळविले जन पोटासाठीं ॥२॥

काय आम्ही आतां पोटचि भरावें । जग चाळवावें भक्त म्हूण ॥३॥

तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणोनि यादव दुरी झाला ॥४॥

comments powered by Disqus