भजन तें ओंगळवाणें । नरका ...

 

भजन तें ओंगळवाणें । नरका जाणें चुकेना ॥१॥

काय करावें घोकिलें । वेदपठन वायां गेलें ॥२॥

वेदीं सांगितलें तें न करी । ब्रह्म म्हणे दुराचारी ॥३॥

तुका म्हणे कैंचें ब्रम्ह । अवघा विषयाचा भ्रम ॥४॥

comments powered by Disqus