स्वयें झाला ब्रम्ह अंगें ...

 

स्वयें झाला ब्रम्ह अंगें जो आपण । त्यासीच हे जन अवघे देव ॥१॥

येरांनीं सांगावी रेमठ काहणी । देह दिन रजनी कर्मावया ॥२॥

धालें नेणें आणिकांची ताहान भूक । नकळे तें सुख वेगळेंचि ॥३॥

तुका म्हणे येथें पाहिजे जातीचें । येर गबाळाचें काम नाहीं ॥४॥

comments powered by Disqus