जीवीं जीवा मिठी देऊं । का...

 

जीवीं जीवा मिठी देऊं । कान्हो नीट झोंबी घेऊं ॥१॥

बाप झोंबी सांवळ्यासी । मी तूं नाहीं रे आम्हासी ॥२॥

तुमची सोडोनी चिकोटी । वेगीं धरुं याची काठी ॥३॥

हातीं रिघाले हात । पाय रिघाले पायांत ॥४॥

जीवीं जीवा पडली मिठी । तुका निरवाणी गोठी ॥५॥

comments powered by Disqus