यासी भांडावें तें तोंडें ...

 

यासी भांडावें तें तोंडें । पुरे अंतरींचें कोडें ॥१॥

ऐसा घरींचा या मोळा । जना निकटा जवळा ॥२॥

हाका मारितांचि द्वारीं । यावें धांवोनी बाहेरी ॥३॥

तुका म्हणे वासुदेवें । सांगितलें हातीं द्यावें ॥४॥

comments powered by Disqus