धन्य झाली भेटी । नाचुं वा...

 

धन्य झाली भेटी । नाचुं वाळवंटीं ॥ध्रु०॥

सौरी झालें भलें केलें मज पांडुरंगें । संसार घोर सांडुन दूर नेलें आपुलें संगें ॥१॥

एकाएकीं महामुखीं निजलें एका शेजे । अवघा सखा दावि लोकां नाहीं तुझें माझें ॥२॥

तुका म्हणे नलगे येणें पुन्हां या संसारा । तिलांजली देउनियां नामिं केला थारा ॥३॥

comments powered by Disqus