उंच नारी दीर्घ भारी दादले...

 

उंच नारी दीर्घ भारी दादले ठेंगणें पोरी । एकाएकीं हाता नये सावलें केलें वरी ॥१॥

चाल धण्या भावा । लिंग नासलें देवा ॥ध्रु०॥

उंच माडी त्यावर ताडी पलंग घाल गे झोडी । सारी रात घसके घेतां झाली तडातोडी ॥२॥

भाव विडा भक्तिचुडा डौर नाहीं जोडा । थाक तोडी डोळे मोडी दाढीचा केला बोडा ॥३॥

मन मुका घेति फुका जनाचा घेती थुंका । इतुकें जरी हाता ये तरी होय चैतन्य तुका ॥४॥

comments powered by Disqus