संत तुकाराम - ऐसी वाट पाहें निरोप कां म...

 

ऐसी वाट पाहें निरोप कां मूळ । कां हे कळवळ तुज उमटेची ना ॥१॥

अहो पांडुरंगे पंढरीनिवासे । लावोनियां कासे चालवीं विठ्ठले ॥२॥

काय जन्मा येउनि केली म्या जोडी । ऐसें घडी घडी चित्ता येतें आठवूं ॥३॥

तुका म्हणे खरा न पवेचि विभाग । धिःकारितें जग हेंचि लाहों ही (?) सेवे ॥४॥

comments powered by Disqus