संत तुकाराम - जाणूं नेणूं काय । चित्तीं...

 

जाणूं नेणूं काय । चित्तीं धरुं तुझे पाय ॥१॥

आतां हेंचि एक वर्म । गाऊं धरुनियां प्रेम ॥२॥

कासया सांडूं मांडूं । भेव हृदयींचें काढूं ॥३॥

तुका म्हणे देवा । जन्मोजन्मी मागों सेवा ॥४॥

comments powered by Disqus