संत तुकाराम - आणीक मी कोणापाशीं मुख वास...

 

आणीक मी कोणापाशीं मुख वासूं । निश्चितीनें असूं कोण्या गुणें ॥१॥

आणिक कोणासी हित पुसों सांग । जाणे अंतरंग कोण माझें ॥२॥

वेळोवेळां पाहें तुझ्या मुखाकडे । सांगूं कोणापुढें गुज गोष्टी ॥३॥

तुका म्हणे किती येऊं काकुलती । येऊं द्या श्रीपति कृपा तुम्हा ॥४॥

comments powered by Disqus